वीज मीटरमध्ये छेडछाड ; गुन्हा दाखल
। अहमदनगर । दि.03 डिसेंबर । घर व दुकानात बसविलेल्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणार्या दोघांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशोक भीमसेन अकोलकर व अक्षय अशोक अकोेलकर (दोघे रा. सूर्यानगर, तपोवन रोड, सावेडी) अशी गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानोबा सदाशिव बंडगर यांनी फिर्यादी दिल्या आहेत.
जनावरांसह टेम्पो कोतवाली पोलिसांच्या ताब्यात
बंडगर यांच्यासह भरारी पथकातील सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी विक्रम साव, वरिष्ठ तंत्रज्ञ गुरूदास सावंत यांनी 17 ऑक्टोबर, 2022 रोजी अक्षय अकोलकर याच्या घरी भेट दिली. तेथील वीज मीटरची तपासणी केली असता त्यामध्ये छेडछाड केल्याचे निदर्शनास आले. त्याने 12 महिन्यात एकुण 32 हजार 670 रूपये किंमतीची एक हजार 924 युनिट वीज चोरी केल्याचे उघड झाले. यावरून गुन्हा दाखल केला आहे.
सरकारच्या पैशांचे आमिष दाखवून वृध्द महिलेची फसवणूक
तसेच सूर्यानगर येथील अशोक भीमसेन अकोलकर याच्या मालकीच्या कन्हैय्या कलेक्शन व शिंदे डेअरी बेकर्स डेलीनीड्स दुकानातील वीज मीटरची तपासणी केली असता त्यामध्येही छेडछाड केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. अशोक अकोलकर याने 24 महिन्यात 15 हजार रूपये किंमतीची 754 युनिट वीज चोरी केल्याने त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.