अशोक कुटे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

 अशोक कुटे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित.

 आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचा पुरस्कार

। अहमदनगर । दि.07 डिसेंबर ।सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटविणारे अहमदनगर येथील अशोक पांडुरंग कुटे यांना नुकताच पुणे येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलजी जाधव, तेजस्विनी महिला विकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा संगीता शिंदे, आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे, सचिव दिपक काळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते हा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून देण्यात आला.

कोरोना काळात भरीव मदतकार्य, कोरोना मध्ये उध्वस्त झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसनाचे कार्य, मराठी सोयरीक संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातून मोफत ३००० लग्न जमवल्याबद्दल व इतर विविध विषयातील सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याबद्दल सरांना हा राष्ट्रीय समाजभुषण पुरस्कार देण्यात आला. अशोक कुटे हे कोरोना काळातील विधवा महिला, अनाथ मुले यांच्यासाठी पुनर्वसन समितीच्या माध्यमातून अ.नगर जिल्हा समन्वयक म्हणून सक्रिय कार्य करत आहेत. पद्मश्री पोपटराव पवार व सामाजीक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली 'विधवा महिला विवाह' ही सामाजिक चळवळ देखील त्यांनी सुरू केली आहे. 

कोरोना काळात १५ दर्जेदार आहे. बेडचे वाटप, किराणा वाटप, मेडिकल साहित्य वाटप, पेशंटची बिले कमी करणे, बेड मिळवून देणे, कुटुंबातील सर्वांचे व इतर मित्र परिवारांचे नेहमी अनाथाश्रमात वाढदिवस साजरे करणे, नेहमी पूरग्रस्तांना घरपोहोच भरीव मदत देणे, नवीन तरुण उद्योजकांना मार्गदर्शन, रक्तदान शिबिरे घेणे, माणुसकीची भिंत, मराठा क्रांती मोर्चात सहभाग इत्यादी अनेक सामाजिक विषयात त्यांचे बहुमोल योगदान आहे. जयश्री कुटे या त्यांच्या पत्नी असून त्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्य आहेत. मॅडमचे देखील सरांसोबत प्रत्येक कार्यात सक्रिय सहभाग असतो, म्हणून या दाम्पत्यांना एकत्रित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

विशेष म्हणजे हे दोघेही सरकारी नोकरी करून उरलेल्या वेळेत हे सामाजिक कार्य गेल्या पंधरा वर्षांपासून करत आहेत. 'मराठी सोयरीक संस्था' च्या माध्यमातून राज्यभरातून आत्तापर्यंत तीन हजार मोफत लग्न जमलीत व पार पडलीत. ६५ वधु-वर मेळावे घेतलेत. सरांमुळे वधू-वर मेळाव्याची नवीन संकल्पना समाजामध्ये रूढ झाली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल या दाम्पत्याचे राज्यभरातून शैक्षणिक, सामाजिक, कृषी, आरोग्य विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी वर्ग, मित्रपरिवार, नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.

-------

💮 मानसग्रामच्या वर्धापन दिनानिमित्त आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा 

💮 महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरण : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

💮  गोण्यांमध्ये भरुन ठेवलेले 50 हजाराचे सोयाबीन चोरीला 

Post a Comment

Previous Post Next Post