दहशत पसरविणारा दोन वर्षांकरिता तडीपार

। अहमदनगर । दि.12 डिसेंबर । आलमगीर, भिंगार परीसरात दहशत निर्माण करणारा जुळ्या भावांपैकी एकास अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता तडीपार  करण्यात आले आहे. सोहेल अन्सार मोमीम (वय 24 वर्षे, रा. मदनी मस्जिद जवळ, आलमगीर, भिंगार, ता. जि. अहमदनगर) असे तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनकडून सोहेल मोमीम याचेविरूद्ध उपविभागीय दंडाधिकारी, नगर भागाचे श्रीनिवास अर्जुन यांचेकडे हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आला होता. 

त्यानुसार वरील गुन्हेगारास अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आल्याचा आदेश भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याला प्राप्त झाला आहे. वरील गुन्हेगारास अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले असून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. 

सदरची कार्यवाही भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, सफौ कैलास सोनार, पोहेकॉँ गोविंद गोल्हार, पोना राहुल द्वारके, पोना भानुदास खेडकर यांनी सदरची कारवाई केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post