। अहमदनगर । दि.08 डिसेंबर । नगर-औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी हॉटेल समोर चौकात गतीरोधक बसवण्याची मागणी तपोवन रोड परिसरातील नागरीकांनी कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग, नगर व उपअभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग क्र. 2 नगर यांचेकडे निवेदन देऊन केली आहे. त्याची प्रत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनाही देण्यात आली आहे.
इंद्रायणी चौकात तपोवन परिसरातुन येणार्या- जाणार्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अल्पावधीतच इंद्रायणी बस स्टाप निर्माण झाला असून तपोवन येथील नागरिकांना नगरमध्ये जाण्या-येण्यासाठी हा रोड सोईचा आहे. तसेच या चौकात व्यवसायिकांचे प्रमाण वाढत आहे. येथे गतीरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शाळकरी मुले, भाजीपाला व्यवसायिक, बांधकाम व्यवसायिक मोठ्याप्रमाणावर या चौकाचा वापर करीत आहे.
याच रोडवर नको त्या ठिकाणी गतीरोधक आहेत. पाहिजे त्या ठिकाणी गतीरोधक नाहीत. तेव्हा या चौकात गतीरोधक बसवावा, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर संदीप पालवे, दत्तू शिरसाठ, अशोक काळे, लक्ष्मण काळे, स्वप्निल कासवा, एस.रहेमान खान, संदीप कीनगे, विक्रम आव्हाड, संतोष लोंढे, सोमनाथ नजन, गोरक्षनाथ दरवडे, रवींद्र कैतके, आसाराम लाहोटी, भगवान आव्हाड यांच्या सह्या आहेत.
--------
अशोक कुटे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
मानसग्रामच्या वर्धापन दिनानिमित्त आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा
महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरण : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस