मानसग्रामच्या वर्धापन दिनानिमित्त आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा


। अहमदनगर । दि.06 डिसेंबर । स्नेहालयातील मानसग्राम प्रकल्पाच्या दुस-या वर्धापन दिनानिमित्त मानसिक स्वास्थ्य काळाची गरज या विषयावर आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांतील सर्व शाखांमधील पदवीधर, पदव्युत्तर, एमएसडब्ल्यू, तसेच मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.

मन, मानसिक अस्वास्थ्याची सध्याची कारणं, मानसिक अस्वास्थ्याचे सामाजिक दुष्परिणाम, मानसिक अस्वास्थ्यावर उपाययोजना, मानसिक स्वास्थ्यासाठी आपली सामाजिक भूमिका, व्यसने आणि मानसिक आरोग्य या मुद्यांचा विचार निबंध लिहिण्यासाठी करता येईल. शब्द मर्यादा पंधराशे असून मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत लिहिलेले निबंध १२ डिसेंबरपूर्वी स्नेहालय प्रतिसाद केंद्र, लेंडकर मळा, बालिकाश्रम रस्ता, अहमदनगर या पत्त्यावर पाठवायचा आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. प्रथम क्रमांक २००० रूपये, द्वितीय १५००, तृतीय १०००, तसेच दोन उत्तेजनार्थ ५०० रूपये आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. उत्कृष्ट निबंध रेडिओ नगर ९०.४ एफएमवरून प्रसारित केले जातील.

परगावच्या विद्यार्थ्यांनी snehamanoyatri@snehalaya.org या ईमेलवर पीडीएफ करून निबंध पाठवावा, असे आवाहन प्रकल्प समन्वक रमाकांत दोड्डी व मानद संचालिका दीप्ती करंदीकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९०११०११००६

-------

💢 महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरण : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

💢 राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

💢 कृषी विभागाला विमा योजनेच्या संदर्भात प्रभावी काम करावे लागेल : महसूल तथा पालकमंत्री विखे पाटील 

Post a Comment

Previous Post Next Post