नगर जिल्हयातुन हद्दपार असलेला गुन्हेगार जेरबंद

। अहमदनगर । दि.14 डिसेंबर ।  नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापुर रोड, हरीमळा, येथुन जेरबंद केले. पप्पु ऊर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे (रा. हरीमळा, सोलापुर रोड) असे जेरबंद केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला 17 जानेवारी, 2022 रोजीपासून दोन वर्षांकरीता नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

वाघमारे याने हद्दपार आदेशाचा भंग करून बेकायदेशिररित्या नगर भागामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरूध्द पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. दिनेश तुळशीराम वाघमारे हा हद्दपार असताना लपूनछपून त्याचे घरी राहतो, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

त्यांनी पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, रवी सोनटक्के, रणजीत जाधव यांच्या पथकाला वाघमारे याला अटक करण्याच्या सूचना केल्या. पथकाने सापळा लाऊन वाघमारे याला शिताफीने ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

--------

मंत्रिमंडळ निर्णय : जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरु करणार 

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणार कालबाह्य तरतुदी काढणार

दहशत पसरविणारा दोन वर्षांकरिता तडीपार 

Post a Comment

Previous Post Next Post