। अहमदनगर । दि.09 डिसेंबर । इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणा-या, मुलां-मुलींसाठी शासकीय वसतिगृह भाडे तत्वावर सुरु करण्यासाठी, अहमदनगर शहरात इमारत भाडेतत्वावर देण्यासाठी इच्छुक इमारत मालकांनी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी प्रसिध्दी पत्रकातन्वये केले आहे.
इमारत अहमदनगर शहरात भाडे तत्वावर घेणेसाठी पुढील निकष आहेत. इमारत शैक्षणिक संस्थांच्या मध्यवर्ती ठिकाणी असावी, इमारतीचे क्षेत्रफळ मोकळया जागेसह प्रति विद्यार्थीनी 100 चौ. फुट याप्रमाणे या वसतिगृहासाठी 10.000 चौ.फुटापर्यंत इमारतीचे क्षेत्रफळ असावे, प्रति 10 विद्यार्थ्यीनीसाठी 01 स्नानगृह व 01 स्वच्छतागृह असावे, इतर आवश्यक सोयी-सुविधा जसे पुरेसा पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा, पथदिवे विद्यार्थीनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सोयी,
इमारत मालकांना दरमहा अपेक्षित असलेले इमारत भाडे व मालमत्ता कर इ. जे इमारत मालक उपरोक्त भाडे तत्वाचे निकष पूर्ण करीत असतील अशा इमारत मालकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, मनमाडरोड, अहमदनगर येथे आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव पुढील 15 दिवसाच्या आत या कार्यालयात सादर करावा. अधिक माहितीसाठी 0241-2329378 या दूरध्वनी क्रमांकावर इमारत मालकांनी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
-------