। अहमदनगर । दि.06 डिसेंबर । शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना महिलेला सासू-सासर्याने मारहाण केली तर दीराने विनयभंग केल्याची घटना रविवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत घडली. पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिचे सासू-सासरे व दीराविरूध्द मारहाण, विनयभंग कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिलेचे पती सात वर्षापूर्वी मयत झाले आहे. त्या दोन मुलीसह सासरी राहत आहे. रविवारी सायंकाळी त्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत होत्या. त्यावेळी तेथे त्यांचा दीर आला. तो फिर्यादीला म्हणाला,
‘तुझ्या बापाची शेती आहे काय’, तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाली,‘ही शेती माझ्या पतीची आहे आणि त्यावर माझा हक्क आहे’, असे म्हणाल्याने त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
फिर्यादीने प्रतिकार केला असता त्यांचे सासू-सासरे तेथे आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
-------
💥 गोण्यांमध्ये भरुन ठेवलेले 50 हजाराचे सोयाबीन चोरीला