। अहमदनगर । दि.19 डिसेंबर । घराचा दरवाज्याचे कुलूप उघडताना 45 वर्षीय महिलेने तिच्याकडील सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स काढून पाया जवळ ठेऊन कुलूप उघडत असता पाठीमागून आलेल्या चोरट्याने दागिनेसह पर्स चोरून नेली. ही घटना नगर तालुक्यातील पोखर्डी शिवारातील भैरोबा मंदिराच्या मागे घडली.
याबाबतची माहिती अशी की सुवर्णा राजू वारुळे ( वय 45 राहणार भैरोबा मंदिराच्या मागे पोखर्डी तालुका नगर ) या त्यांच्या काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या. बाहेरील काम आटोपून त्या घरी आल्या असता त्यांच्या बंद घराच्या दरवाज्याची कुलूप उघडण्याकरिता त्यांनी त्यांच्या खांद्याला असलेली पर्स, आतील दीड तोळे वजनाचे
सोन्याचे मंगळसूत्र, दीड तोळे वजनाचे सोन्याचे त्रिकोणी मिनीगंठणसह खाली ठेवली. व कुलूप उघडत असताना अचानक पाठीमागून एकाने येऊन त्यांच्या पायाजवळ ठेवलेली पर्स उचलून चोरून नेली. पळताना रस्त्याच्या काही अंतरावर मोटारसायकल थांबलेल्या त्याच्या सहकार्याच्या मोटारसायकलवर बसून चोरटे पसार झाले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सुवर्णा राजू वारुळे ( वय 45 राहणार पोखर्डी तालुका नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 379 34 अन्वये चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक आव्हाड करीत आहे.
----------
आम्हाला गाडी आडवी का लावली म्हणत मारहाण
दिल्लीगेट परिसरात लाखो रुपयांचा गुटखा जप्त
महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण धूम स्टाईलने चोरीला
समृध्दी महामार्गावर नागपूर ते शिर्डी दरम्यान धावली पहिली एसटी बस !