। अहमदनगर । दि.05 डिसेंबर । बुलेट दुचाकीने धडक दिल्याने वृध्द महिलेचा मृत्यू झाला. निर्मला सदाशिव मोरे (वय 62 रा. बुरूडगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.
हा अपघात 18 नोव्हेंबर रोजी नगर-दौंड रोडवरील शितल हॉटेलजवळ झाला असून याप्रकरणी 3 डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दुचाकी स्वाराविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
आशिष शेळके (रा. गुणवडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मयत निर्मला मोरे यांचा मुलगा प्रवीण सदाशिव मोरे (वय 41 रा. बुरूडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
-------
💥 कृषी विभागाला विमा योजनेच्या संदर्भात प्रभावी काम करावे लागेल : महसूल तथा पालकमंत्री विखे पाटील
💥 मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची पाहणी; उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः चालविले वाहन
Tags:
Maharashtra