। अहमदनगर । दि.17 डिसेंबर । सावेडी उपनगर परिसरात महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत रस्त्यावर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली साहित्य अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जप्त केले अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या सहाय्याने सावेडी प्रभाग कार्यालयाने गुरुवारी ही कारवाई केल्याचे अभियंता रोहिदास सातपुते यांनी सांगितले.
गुलमोहर रस्त्याचे काम चालू असल्याने कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे मनपाकडून हटविण्यात आली. त्यानंतर पाईपलाईन रोड, भिस्ताबाग नाका, वैदुवाडी चौक, पद्मावती चौक येथील दहा मोठे व लहान पंधरा फ्लेक्स बोर्ड जप्त करण्यात आले. दोन सिंटेक्स टाक्याही मनपाने ताब्यात घेतल्या. क्षेत्रीय अधिकारी देविदास बिज्जा, राहुल साबळे आदींसह अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या व सावेडी प्रभाग कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झोपडी कॅन्टीन ते टीव्ही सेंटर रस्त्यावरील हॉस्पिटलसमोर असलेली अतिक्रमणे मनपाने हटविली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी अतिक्रमणे पुन्हा जागेवर आली. महापालिकेकडून केवळ दिखाव्यापूर्तीच कारवाई केली जात असल्याने अतिक्रमणधारकांवर महापालिकेचा कुठलाही वचक राहिलेला नसल्याचे चित्र आहे.
--------
महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण धूम स्टाईलने चोरीला
जिल्ह्यात 28 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
फरार आरोपी जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई