जनावरांसह टेम्पो कोतवाली पोलिसांच्या ताब्यात

। अहमदनगर । दि.03 डिसेंबर । गोवंशीय जनावरांना टेम्पोत घालून कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या तरूणाला कोतवाली पोलिसांनी पकडले. मोहंमद नुर इस्माईल शेख (वय 40 रा. सुभेदार गल्ली, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) असे त्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अभय कदम यांनी फिर्याद दिली आहे.

‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी महावितरणचा उपक्रम 

गुरूवारी सकाळी झेंडीगेट परिसरातील सैदु कारंजा मस्जिदजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. शेखकडून 35 हजार रूपये किंमतीचे दोन गोवंशीय जनावरे, दोन लाख रूपये किंमतीचा टेम्पो असा दोन लाख 35 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सैदु कारंजा येथील मस्जिदजवळ एक इसम टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरे घेऊन कत्तल करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.

वांबोरी घाटात दोन मित्रांना मारहाण करत लुटले 

त्यांनी अंमलदार दीपक बोरूडे, कदम, सलीम शेख, भरत गाडीलकर, अतुल काजळे यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने पंचासमक्ष बातमीतील नमूद ठिकाणी सापळा लावला. संशयीत टेम्पो येताच त्याला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये दोन गोवंशीय जनावरे मिळून आले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास करीत आहेत.

अहमदनगर प्रज्ञा शोध परीक्षेची नावनोंदणी सुरू 

Post a Comment

Previous Post Next Post