नगर तालुक्यातील चार गावांचे आठवडे बाजार बंद

। अहमदनगर । दि.08 डिसेंबर ।   ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. 

अहमदनगर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून मतदान व आठवडे बाजार एकाच दिवशी असल्यामुळे या ठिकाणी मोठया 

प्रमाणावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उप विभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी मार्केट अँड फेअर अ‍ॅक्ट 1862 थे कलम 3, 4 व 5 मधील तरतुदीअन्वये असलेल्या अधिकाराचा वापर 

करून अहमदनगर तालुक्यातील मौजे जखणगांव, सारोळा कासार, सोनेवाडी व चास येथील 18  डिसेंबर रोजीचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post