ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष

195 ग्रामपंचायतींसाठी 80 टक्क्यावर मतदान


। अहमदनगर । दि.19 डिसेंबर । जिल्हयातील 203 पैकी 195 ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि.18) रोजी उत्साहात मतदान झाले. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर ईव्हीएम मशीन तहसील कार्यालयात लॉकर रुममध्ये पोहच करण्यात आल्या. मतदान झाल्यानंतर आता अनेकांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून मंगळवारी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

मतदान यंत्रातकोठेही बिघाड झाल्याची वा कोठे काही अनुचित घटना घडली नसल्याचे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले. जिल्ह्यात मुदत संपलेल्या 203 ग्रामपंचायतींचा निवडणूककार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. निवडणूक कार्यक्रम झाल्या नंतर प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत 8 ग्रामपंचायती आणि 15 सरपंच पदाच्याजागा बिनविरोध झाल्या होत्या.

त्यानंतर उर्वरित 195 ग्रामपंचायत आणि 188 सरपंचपदांच्या जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. रविवारी सकाळी जिल्ह्यातील 14 तालुक्यात सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा प्रशासनाद्वारे मतदानाची आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरू होते. मात्र, अंदाजे 80 टक्क्याच्या वर मतदान झाले असावे, अशी शक्यता वर्तवली गेली. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतमोजणी उद्या मंगळवारी (दि.20 डिसेंबर) होणार असून, यावेळी कोणी बाजी मारली, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.

वाळकी सारोळ्याकडे तालुक्याचे लक्ष
वाळकी या मोठ्या गावातील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. अनेक दिग्गज यात उतरलेले आहेत. सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे. सारोळा कासार येथील निवडणूक ही तालुक्यात चर्चेची बनली आहे. याशिवाय नेप्ती, नारायण डोहो, सोनेवाडी, टाकळी खातगाव, राळेगण म्हसोबा, शेंडी, आठवड, बाबुर्डी बेंद येथील निवडणुकांच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post