फरार आरोपी जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

फरार आरोपी जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई


 
। अहमदनगर । दि.14 डिसेंबर ।   अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी भावेश ऊर्फ बंटी अशोक राऊत यास कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

फिर्यादी नामे रोहित प्रविण चंगेडीया (रा बुरुडगाव रोड अहमदनगर) हे त्याचे मोटर सायकलवरुन त्याचे राहते घरी जात असताना आरोपी यांनी त्यांचे मोटार सायकलवरुन पाठीमागुन येवून तु प्रिन्स हॉटेल येथे भांडण का केले? त्यावर फिर्यादी यांनी गाडी थांबविली असता आरोपी याने फिर्यादीच्या गाडीला लाथ मारली व फिर्यादीस शिवीगाळ केली.

त्यानंतर फिर्यादी हे गाडीवरुन खाली पडले. त्याचे कपाळाला मार लागल्याने रक्त येवू लागले त्यानंतर आरोपी यांने त्याचे जवळ असलेल्या लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारले व तुझ्याकडे बघुन घेईल अशी धमकी दिली. चक्कर येवून पडल्याने आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस निरिक्षक संपत शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हातील आरोपी नामे भावेश उर्फ बंटी अशोक राऊत वय ३० वर्षे रा. माणिक चौक, अहमदनगर हा तपोवन रोड, अहमदनगर येथील एका फ्लॅटमध्ये लपुन बसला आहे.

अशी माहीती मिळाल्यावरुन सदर आरोपींचा शोध घेणे कामी सपोनि विवेक पवार व गुन्हे शोध पथकाचे एक पथक तयार करुन आरोपीच्या शोधार्थ रवाना करुन सापळा लावुन आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा सपोनि विवेक पवार हे करीत आहेत.

सदर आरोपी विरुध्द कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे मालाविरुध्द व शरिराविरुध्द तसेच आर्म अॅक्टचे एकुन १९ गुन्हे दाखल आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, सपोनि विवेक पवार व गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे, पोहेकॉ सतिश भांड, पोहेकॉ गणेश धोत्रे,

 पोना योगेश भिंगारदिवे, पोना रियाज इनामदार, पोना इसराईल पठाण, पोकाँ सुजय हिवाळे, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकाँ संदीप थोरात, पोकॉ अमोल गाढे यांनी केली आहे.

------

🌘 नगर जिल्हयातुन हद्दपार असलेला गुन्हेगार जेरबंद 

🌘 मंत्रिमंडळ निर्णय : जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरु करणार

🌘 कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणार कालबाह्य तरतुदी काढणार 

Post a Comment

Previous Post Next Post