। अहमदनगर । दि.01 डिसेंबर । अहमदनगर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात सुपरिचित असलेली अहमदनगर प्रज्ञा शोध परीक्षा-2023ची ऑनलाईन नावनोंदणी दि. 1 सप्टेंबर 2022पासून सुरू झालेली आहे. ही परीक्षा जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी इयत्ता 4 थी व इयत्ता 7 वीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी जिल्ह्यातील विविध केंद्रावर घेतली जाते.
ऑनलाईन नावनोंदणी, परीक्षेचे वेेळापत्रक, अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप या विषयीची माहिती www.vpahmednagar.in या वेेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी प्रस्तुत परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा महाविद्यालयात प्रत्यक्ष अर्ज सादर करून नावनोंदणी निश्चित करावी.
नावनोंदणीची अंतिम तारीख विलंबासह 15 डिसेंबर 2022 असणार आहे. (महाविद्यालयात सकाळी 10 ते दु. 4 या कार्यालयीन वेेळेत नावनोंदणी करणे अपेक्षित आहे.) आपणास अडचण आल्यास कार्यालयीन वेेळेत (सकाळी 10 ते दु. 4 ) संपर्क क्र. 0241-2551420 वर संपर्क करावा, असे आवाहन परीक्षा संचालक व प्राचार्य डॉ. रवींद्र मा. चोभे व परीक्षा नियंत्रक प्रा. डॉ. अमरनाथ शां. कुमावत, सहाय्यक परीक्षा नियंत्रक प्रा. डॉ. शर्मिला भा. पारधे यांनी केले आहे.
-------
💥 गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात येण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्योगांना आवाहन
💥 स्मशानभूमी व दफनभूमीसाठी स्वमालकीची पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी : ॲड. अभय आगरकर