चाकुचा धाक दाखवून दोन लाख 54 हजार रूपयांना लुटले

। अहमदनगर । दि.12 डिसेंबर । साखर कारखान्यातून स्वस्तात साखर मिळवून देण्याचे अमिष दाखवत पुणे येथील एका व्यक्तीला चाकुचा धाक दाखवून दोन लाख 54 हजार रूपयांना लुटले. नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारातील रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली.

श्रीकांत सुधीर जोशी (वय 47 रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) असे लुटलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर धनराज (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व त्याच्यासोबतचे असलेला अनोळखी इसम (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी जोशी हे व्यावसायिक असून त्यांना सागर धनराज नावाच्या इसमाने नगर जवळ सारोळा कासार परिसरात साखर कारखाना असून या कारखान्यातून तुम्हाला स्वस्तात साखर मिळवून देतो, असे अमिष दाखवले. त्या अमीषाला भुलून फिर्यादी जोशी हे अडीच लाखाची रोकड घेऊन सारोळा कासार येथे आले. 

यावेळी दोघांनी त्यांना चाकुचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन लाख 50 हजाराची रोकड, 1 सॅमसंग कंपनीचा मोबाईल, चांदीची अंगठी व पाकीटातील 250 रूपयांची रोकड असा दोन लाख 54 हजार 450 रूपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला.

-------

डिझेल चोरी करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात 

हात उसने पैसे न दिल्याने मित्रावर टोकदार वस्तुने मारहाण

मटका-जुगार चालवणार्‍या तिघांना पोलिसांनी पकडले 

Post a Comment

Previous Post Next Post