माजी सैनिक संवर्गातून लिपिक-टंकलेखक पदांची भरती इच्छुकांनी 5 डिसेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन
। अहमदनगर । दि.01 डिसेंबर । सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखलील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहमदनगर या कार्यालयामध्ये महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत बाहययंत्रणेद्वारे माजी सैनिक संवर्गातील लिपिक टंकलेखक दोन पदे दैनंदिन रोजंदारी हजेरीप्रमाणे भरण्यात येणार असुन
अहमदनगर शहराजवळ राहत असलेल्या इच्छुक व खालील अटी व शर्तीस पात्र असलेल्या माजी सैनिकांनी आपल्या मुळ कागदपत्रांसहीत महासैनिक मिनी हॉल चाँदनी चौक अहमदनगर येथे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ अहमदनगर जिल्हयाचे व्यवस्थापक यांच्याशी दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
लिपीक-टंकलेखक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा बजावलेली असावी. मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान ३० शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र असावे. महाराष्ट्र शासनाचे MSCIT चे प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य राहील तसेच उमेदवार निर्व्यसनी असावा तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा. उमेद्वाराची वैयक्तिक माहिती पुरविणे आवश्यक राहणार असल्याचेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.