हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांचा छापा

। अहमदनगर । दि.29 नोव्हेंंबर । सावेडी उपनगरातील पंचशील हॉटेलच्या बेसमध्ये ओम मोरा या नावाने सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी रविवारी रात्री छापा टाकला. अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरमधून सात हजार 800 रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सरकारच्या पैशांचे आमिष दाखवून वृध्द महिलेची फसवणूक 

या प्रकरणी दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार संतोष गर्जे यांनी फिर्याद दिली आहे. आयुश भिम भटराय (वय 18 रा. दातरंगे मळा, बालिकाश्रम रोड), गोरख भोला मलिक (वय 18 रा. पश्‍चिम बंगाल, हल्ली रा. वैदुवाडी चौक, नगर) यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. 

अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे 

नगर-मनमाड रोड लगत डौले हॉस्पिटलच्या शेजारी पंचशील हॉटेलच्या बेसमध्ये ओम मोरा नावाचे हुक्का पार्लर चालू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यांनी सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार गर्जे, दत्तात्रय जपे यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

बँकेचे एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न 

पथकाने दोन पंचासमक्ष पंचशील हॉटेलच्या बेसमध्ये छापा टाकला. तेथे पोलिसांना हुक्का साहित्य व आयुश भटराय, गोरख मलिक दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे हुक्का चालविण्याच्या परवानगी बाबत विचारणा केली असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी हक्का साहित्यासह सात हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला 

Post a Comment

Previous Post Next Post