मराठा भुषण चंद्रकांत लबडे यांच्या कार्यालयास पंजाबराव डख यांची भेट

। शेवगाव । दि.03 ऑगस्ट 2022 ।  शिव अभिषेक समिती चे संस्थापक अध्यक्ष मराठा भुषण चंद्रकांत लबडे यांच्या कार्यालयास हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकतीच भेट दिली. त्याप्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ, कृषीराज टकले व मराठा भुषण चंद्रकांत लबडे यांनी डख यांचा सत्कार केला.

👉 पोलिसासह एका खासगी व्यक्ती लाचलुचपतच्या जाळ्यात

यावेळी डख म्हणाले कि, महाराष्ट्रामध्ये सर्व प्रथम शिवअभिषेक समिती च्या माध्यमातुन मराठा भुषण चद्रकांत लबडे यांनी शेवगाव येथे व नंतर पुर्ण महाराष्ट्रात शिव अभिषेक सुरू केले व अखंड पणे अजून पर्यंत चालू ठेवले त्या बद्दल त्यांनी महाराजांचे अभिनंदन केले.अशा प्रकारे महाराष्ट्र भर शिवचळवळ व सामाजिक चळवळ उभी केली आहे या चळवळीतून मावळयांना दिशा भेटणार आहे असे डख साहेब म्हणाले.

👉 एकनाथ शिंदे यांचा ठाकरे यांना दणका...

3 ते 8 तारखेला व या वर्षी नगर जिल्ह्यात पाऊस भरपूर होणार आहे निसर्गाची दिशा ओळखून शेती करावी मी शेतकऱ्यांचे नुकसान मी वाचवणार आणि शेतकरी उभा करणार असे पाडळी येथील राजेश फटांगरे यांच्या पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी डख साहेब म्हणाले.

👉 खोसपुरी येथील तरुणाची विष पिऊन आत्महत्या

यावेळी चंद्रकांत महाराज लबडे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे डॉ. कृषिराज टकले, संतोष कोळगे सर, प्रशांत लबडे पाटील किशोर वाघ, भापकर सरपंच, बंटी म्हस्के, नितेश गटकळ, भाऊसाहेब लबडे कल्याण घोणे, प्रदिप जाधव, अक्षय खोमणे नारायण लबडे, रोहित पायघन आदी उपस्थित होते.

👉 कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान...

Post a Comment

Previous Post Next Post