पोलिसासह एक खासगी व्यक्ती लाचलुचपतच्या जाळ्यात


। अहमदनगर । दि.03 ऑगस्ट 2022 ।  अवैधरित्या दारू विक्री करण्यासाठी परवानगी देऊन महिना 30 हजारांचा हप्ता घेणार्‍या पोलिस अंमलदारासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने अटक केली. अंमलदार शैलेश गोमसाळे व खासगी व्यक्ती वैभव साळुंके (वय 35 रा. नगर) अशी त्यांची नावे आहेत.

👉  एकनाथ शिंदे यांचा ठाकरे यांना दणका...

मंगळवारी पाईपलाइन रोडवरील एकविरा चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. तोफखाना हद्दीतील तक्रारदारास विना परवाना दारू विक्री करण्याची परवानगी देवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात गोमसाळे याने खासगी व्यक्ती साळुंके याच्यामार्फत तक्रारदाराकडे 30 हजार रूपयांची मागणी केली होती. 

👉 पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार : मुख्यमंत्री

तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीवरून 21 जुलै रोजी पडताळणी दरम्यान, लाच मागितल्याचे सिध्द झाले होते. मंगळवारी एकविरा चौक परिसरातील सिटी स्टोअरजवळ खासगी व्यक्ती साळुंके याने गोमसाळे याच्यातर्फे तक्रारदाराकडून 30 हजारांची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

👉  कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखांचे पारितोषिक जाहीर : मुख्यमंत्री

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे नाशिकचे पोलीस निरिक्षक श्रीमती साधना इंगळे, पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक सतीष डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन गोसावी, प्रफुल माळी, चंद्रशेखर मोरे, शरद हेंबाडे, संतोष गांगुर्डे आदींन केली आहे. 

👉 माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षा गुणांच्या टक्केवारीत सूट

Post a Comment

Previous Post Next Post