एकनाथ शिंदे यांचा ठाकरे यांना दणका...


। मुंबई । दि.02 ऑगस्ट 2022 । शिवसेनेनंतर एकनाथ शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. हा मनसेसाठी मोठा हादरा दिला आहे. या हादर्यानंतर शिंदे आता शिवसेनेबरोबरच मसनेला संपविण्यासाठी पुढाकार घेत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेचा 39 आमदार शिंदे गटात डेरेदाखल झाले आहेत. तर काही माजी आमदार आणि नेतेही शिंदे गटात दाखल होत आहेत. 

काही नगरसेवक व पदाधिकारीही यांनीही शिंदे गटाची सोबत धरली आहे. आता शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. हा मनसेसाठी मोठा हादरा मानला जात आहे.

शिंदे गटाने पनवेलमध्ये मनसेला खिंडार पाडल्याचे दिसून येत आहे. पनवेल, उरणमधील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मुंबईतील मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात हा पक्ष प्रवेश झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहे.  उरण आणि पनवेलमधील मनसे खारघरची पूर्ण टीम शिंदे गटात दाखल झाली आहे. त्यामुळे शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरु असल्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा एकदा सुरु झाली आहे. 

-------------

👉 कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखांचे पारितोषिक जाहीर : मुख्यमंत्री

👉 खोसपुरी येथील तरुणाची विष पिऊन आत्महत्या

👉 पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार : मुख्यमंत्री

Post a Comment

Previous Post Next Post