पंतप्रधान अन् मुख्यमंत्री यांना थेट मतदान करत नाही...

। खेड । दि.16 जुलै 2022 । सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. पण, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना थेट जनता मतदान करत नाही, मग थेट सरपंचच का जनतेतून निवडला जातो? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला आहे.

अजित पवार हे खेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी खेड तालुक्यातील चाकण येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना संपूर्ण जनता मतदान करत नाही मग थेट सरपंचच का जनतेतून निवडला जातो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ज्याच्याकडे मनी पॉवर, मसल पॉवर जास्त अशी लोकं सरपंच होतात व अशा वेळेस सर्वसामान्य काम करणाऱ्या व्यक्ती वरती अन्याय होतो. त्यामुळे थेट जनतेतून सरपंच व नगराध्यक्ष निवडीवरती अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

सरकारने घेतलेल्या सरपंच व उपसरपंच निवडीचा निर्णय राज्यात अस्थिरता आणणारा ठरणार आहे. त्यामुळे अनेकजण फक्त या पदाकडे लक्ष ठेऊनच निवडणूक लढवतील.

------------

👉 शिवसेनेतून नेते अऩ् पदाधिकाऱ्यांची हकलपट्टी सुरुच...

👉 एकनाथ शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का...

👉 सूर्यानगर परिसरात वेश्या व्यवसायावर छापा

Post a Comment

Previous Post Next Post