खासगी कंपनीचे लाचखोर अधिकारी जाळ्यात


। अहमदनगर । दि.21 जुलै 2022 । महावितरण कंपनीतील नोंदणीकृत असलेल्या प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनीच्या महिला कर्मचार्‍यासह व्यवस्थापकास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

कंपनीचा व्यवस्थापक सुनील पोपट पर्वत (वय 40 राहणार निंबाळे, तालुका संगमनेर) व सुजाता तेजस कांबळे (वय 33 राहणार मालदाड रोड, तालुका संगमनेर) अशी लाचखोर अधिकार्‍यांची नांवे आहेत.

महावितरण कंपनीतील संगमनेर शहर विभागात तक्रारदार यांची कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्ती आहे. त्यांची नियुक्ती प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनीमार्फत करण्यात आलेली आहे.

ही कंपनी शासनाकडे नोंदणीकृत आहे. महावितरण कर्मचार्‍यांच्या पगराची रक्कम प्रथमेश कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तक्रारदार यांनी त्यांचे जून महिन्याचे वेतन बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी प्रथमेश इलेक्ट्रिक कंपनीचा व्यवस्थापक सुनील पर्बत यांच्याकडे केली होती.

त्यावर व्यवस्थापक पर्बत याने त्यांना तीस हजाराची लाच मागितली होती. यावर तक्रारदाराने लाचलुचपतकडक तक्रार केली होती. यावर बुधवारी लाचखोरास पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक हरिश खेडकर, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलिस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक हरुन शेख आदींच्या पथकाने केली.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
*@ टोल फ्रि क्रं. १०६४*

-----------

👉 शिंदे - ठाकरे यांच्या याचिकांवर आता 1 ऑगस्टला होणार सुनावणी 

👉 अल्पवयीन मुलीचा लैंगिकछळ केल्याप्रकरणी सक्तमजुरी

👉 राज्याच्या प्रगतीसाठी लोकहिताचे निर्णय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


Post a Comment

Previous Post Next Post