बनावट विमा पॉलिसी देऊन सहा लाखाची केली फसवणूक


। अहमदनगर । दि.03 जुलै 2022। ग्राहकांना बनावट विमा पॉलिसी देऊन सहा लाखाची फसवणूक करणार्‍या महिलेस अटक करण्यात आली आहे. ग्राहकाकडून आकारणी केलेल्या रकमेप्रमाणे रक्कम टाकून त्याची प्रिंट काढून बनावट इन्श्युरन्स पॉलिसी ग्राहकास देऊन 110 ग्राहकांकडून पैसे घेऊन व नंतर भरणा रकमेत फेरफार करून सहा लाख पंधरा हजार 684 रुपयाचा अपहार करून फसविणार्‍या 26 वर्षीय तरुणीस कोतवाली पोलिसांनी अटक केली. 

याबाबतची अधिक माहिती अशी की सिमरन नंदकुमार पाटोळे (वय 26, राहणार जय मल्हारनगर, वडगाव गुप्ता, अहमदनगर. हल्ली राहणार, सिद्धांत सांगळे, चेतना कॉलनी, द्वारकादास शामकुमार पाठीमागे, श्रीरंगनगर, नागापूर एमआयडीसी, अहमदनगर) यांनी केडगाव येथील वाशिम ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड या शोरूम मध्ये काम करीत असताना सन 2018 ते एक जुलै 2020 दरम्यानच्या काळात सिमरन पाटोळे हिने 110 ग्राहकांकडून इन्शुरन्स पॉलिसी देऊन त्यांच्याकडून आकारणी केलेल्या रकमेप्रमाणे रक्कम टाकून त्याची प्रिंट काढून बनावट इन्शुरन्स पॉलिसी ग्राहकांना देऊन शोरूममध्ये कमी भरणा केला.

तसेच आईडी बीमध्ये फेरबदल करून ग्राहकांना जास्त रक्कम भरल्याच्या फेरफार केलेल्या इन्शुरन्स पॉलिसी देऊन सहा लाख पंधरा हजार 664 रुपयांचा अपहार करून ग्राहकांची व शोरूमची फसवणूक केली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अनिश सुभाष आहुजा (वय 38, राहणार तारकपूर, ज्योती मेडिकल मागे. हल्ली राहणार टॉप अप पेट्रोल पंप, नगर-औरंगाबाद रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिमरन पाटोळे हिच्याविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली कोतवाली पोलिसांनी पाटोळे हीच अटक केली आहे.

--------------

👉 अडीच वर्षांच्या अन्वी घाटगेची कळसुबाई शिखराला गवसणी

👉 शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, रोख मदत देण्याची काँग्रेसची मागणी

👉 5 जुलैपासून राज्यात चांगल्या पवासाची शक्यता

Post a Comment

Previous Post Next Post