केवळ सत्तेसाठीचे राजकारण सोडावे वाटतेे : नितीन गडकरी

। नागपूर । दि.25 जुलै 2022 ।  रोखठोक व कार्यक्षम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सत्तेसाठी सुरू असलेल्या राजकारणाला आपण कंटाळलो असून राजकारण सोडण्याची भाषा केली आहे. ‘पूर्वी राजकारण म्हणजे समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण व सत्ताकारण होते. 

आता राजकारण हे १०० % सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे राजकारण केव्हा सोडू अन् केव्हा नको असे वाटत आहे,’ असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. भारतात आर्थिक, सामाजिक जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी राजकारण माध्यम होते. मात्र, आता राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे,असे गडकरी यांनी सांगितले.

--------------

👉 द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ!

👉  आदित्य ठाकरे यांचा शिर्डी आणि नेवासा येथे कार्यकर्त्यांशी संवाद

Post a Comment

Previous Post Next Post