वृक्षारोपण हाच पर्यावरण असमतोलावर एकमेव पर्याय : मनोज पाटील

वृक्षारोपण हाच पर्यावरण असमतोलावर एकमेव पर्याय : मनोज पाटील

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल तर्फे वृक्षारोपण संपन्न


। अहमदनगर । दि.13 जुलै 2022 । रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांच्या माध्यमातून पर्यावरण बचाव करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज परिसरात अहमदनगर जिल्ह्याचे माननीय पोलिस अधीक्षक श्री मनोज पाटील साहेब यांच्या  वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्याचा उपक्रम रोटरीचे अध्यक्ष डॉ.दिलीप बागल व सचिव हरीश नय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

बुधवार रोजी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल च्या उपप्रांतपाल सौ. गीता गिल्डा, बाळासाहेब कर्डिले, माजी उपप्रांतपाल डॉ. दादासाहेब करंजुले, रोटरी सेंट्रलचे नीवर्तमान अध्यक्ष ईश्वर बोरा, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शिरीष रायते यांच्या प्रमुख उपस्थितीत क्लब ट्रेनर राजेश परदेशी, मनीष बोरा, राजीव गुजर, हितेश गुप्ता, चेतन अमरापुरकर, सुजाता कटारिया, सुनील कटारिया, नरेंद्र चोरडिया, गोविंद कनोजिया, निलेश शहा, विनोद बोरा व इतर सदस्य रोटेरियन व बाबासाहेब खरबस, सुधीर मुळे, आदिनाथ लवांडे आदी शिक्षक यांच्या द्वारे संपन्न झाला. 

यावेळी बोलताना दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठया प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. दिवसेंदिवस पर्यावरणाचा बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे.

यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठया प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक श्री मनोज पाटील यांनी केले. रोटरी सेंट्रल चे अध्यक्ष डॉ. बागल यांनी प्रास्ताविकात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्याचा हेतू मांडला.

त्यानंतर मार्गदर्शन करताना उपप्रांतपाल सौ. गीता गिल्डा यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व मांडले. रोटरीसारखी संस्था हे काम निश्चितपणे करू शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी शासकीय तंत्रनिकेतन चे शिक्षक अभियंता व माजी उपप्रांतपाल डॉ. करंजुले यांनी वृक्षारोपण किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व विशद केले. वनसंपदेवर मानवाची बरीचशी कामे अवलंबून असून वृक्षांचे रोपण व संवर्धन होणे महत्त्वाचे आहे.

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या वेळी शंभरपेक्षा अधिक फळझाडांची रोपे लावण्यात आली. हरिष नय्यर यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी प्रत्येक झाडाला रोटरी सभासदांचे नाव देऊन त्याचे पालकत्व शासकीय तंत्रनिकेतन च्या विद्यार्थ्यांना देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post