प्रचलित अनुदानासाठी भरपावसात प्राध्यापकांची मोटरसायकल दिंडी

प्रचलित अनुदानासाठी भरपावसात प्राध्यापकांची मोटरसायकल दिंडी

बा.. विठ्ठला.. सरकारला सद्बुद्धी दे..पंढरपुरात घातले साकडे!


। अहमदनगर - दि.12 जुलै 2022 ।  गेल्या वीस वर्षांपासून शिक्षकांच्या जीवाशी खेळणार्‍या सरकारला जागे करण्यासाठी तसेच प्रचलित अनुदान तातडीने द्यावे, या मागणीसाठी प्राध्यापकांनी नगरहून पंढरपूरला मोटारसायकल दिंडी काढून बा.. विठ्ठला सरकारला सद्बुद्धी दे.. असे साकडे घातले! नगरहून शनिवारी दुपारी दोन वाजता भर पावसात निघालेली मोटारसायकल दिंडी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पंढरपूरला पोहोचली. दरम्यान,शिंदे-भाजप सरकारने शिक्षकांचे प्रश्न सोडवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

शहरातील ग्रामदैवत श्रीविशाल गणपती येथे महाआरती करून मोटरसायकल दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली. यावेळी उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी प्रचलितनुसार अनुदान द्या.. अशा घोषणा दिल्या. त्यामुळे मंदिराचा परिसर दणाणून गेला होता. या मोटारसायकल दिंडीमध्ये प्रा. संजय शेवाळे, सुभाष चिंधे, शेखर अंधारे, ज्ञानेश्वर बर्डे, किशोर सप्रे, ऋषिकेश माताडे, प्रमोद कानडे, प्रा. देविदास हरवणे, रवींद्र धायतडक, प्रा. उमादेवी राऊत, कल्पना तुपे, आश्विनी घोडके, विद्या बाबर, पूनम साठे, सुवर्णा बारगळ, विजया संसारे आदी शिक्षक या आंदोलन दिंडीत सहभागी झाले होते.


प्राध्यापकांचा कोणत्याही सरकारने विचार केला नाही. शिंदे-भाजप सरकारने प्राध्यापकांच्या अनुदानाचा विचार करावा. तो विचार न केल्यास यापुढे शिक्षक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रा. सुभाष चिंधे यांनी दिला. यावेळी प्रा. संजय शेवाळे यांनी गेल्या वीस वर्षांपासून सरकार प्राध्यापकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. शिक्षकांनी विविध आंदोलन केली. त्यानंतरही सरकारला जाग येत नाही. पूर्ण पगार मिळावा, प्रचलितनुसार अनुदान मिळावे, यासाठी शेकडो प्राध्यापकांचा बळी गेला असून,

त्याला सरकार जबाबदार असल्याचे म्हणाले. तसेच प्रा. उमादेवी राऊत यांनी मंत्र्यांनी राजकारणाचा खो-खो बंद करावा. मुंबई केलेल्या आंदोलनात पोलिसांनी शिक्षकांवर पोलिसांंनी लाठीहल्ला केला. अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्या तर बर्या शिक्षकांना हृदयविकाराच्या झटक्याने जीवास मुकावे लागले. सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी दुचाकी दिंडी काढली आहे. मागण्या मान्य न केल्यास शिक्षक आता रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

----------------

👉 जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

👉 पुन्हा अरमनाथ यात्रा सुरु

👉 पाय घसरून विहिरीत पडल्याने 46 वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू

Post a Comment

Previous Post Next Post