एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे राज्याच्या दौर्यावर...

 

। मुंबई । दि.17 जुलै 2022 ।  एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात राजकीय नुकसान झाले आहे. संघटनात्मक पातळीवरही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाला नवसंजीवणी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला खिंडार पडले आहे. आमदारांनंतर विविध महापालिकेतील नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला. आता तर शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही आपला दावा सांगितला आहे.

त्यामुळे शिंदेच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाला नवी भरारी देण्यासाठी व शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरे या महाराष्ट्र दौऱ्यात पक्षाला मजबुत करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरणार आहेत. संघटनात्मक पातळीवर  कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावेही घेणार आहेत.

राज्यातील राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे सातत्याने मातोश्रीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह बैठका घेत आहेत. त्यामुळे आता ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. यामुळे शिंदे गटातही चलबिचल होण्याची शक्यता आहे. आता ठाकरे काय भाषण करतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

---------------

👉 एकनाथ शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का...

👉 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही...

👉 शिवसेनेतून नेते अऩ् पदाधिकाऱ्यांची हकलपट्टी सुरुच...

Post a Comment

Previous Post Next Post