शिवसेनेतून नेते अऩ् पदाधिकाऱ्यांची हकलपट्टी सुरुच...

। मुंबई । दि.16 जुलै 2022 । एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेतून नेते, पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे सत्र सुरु झालेले आहे. ते अद्यापही सुरु आहे. माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश जारी केलेत.

विजय शिवतारे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्व देखील रद्द केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत होते. विजय शिवतारेंच्या हकालपट्टीनंतर पुरंदरमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.  आता यानंतर नेमकी कोणाची हकलपट्टी  होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एकाच वेळी अनेकजण शिवसेनेतून बाहेर का पडत आहेत, याचा उध्वद ठाकरे यांनी अभ्यास करावा, अशी अपेेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांमधून व्यक्त केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तसेच कारवायाही शिवसेनेला कराव्या लागत आहे. 

---------------

👉 सूर्यानगर परिसरात वेश्या व्यवसायावर छापा

👉 एकनाथ शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का...

👉 रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही...


Post a Comment

Previous Post Next Post