जिल्हा परिषदेत अनुकंपा भरती

। अहमदनगर । दि.14 जुलै 2022 । जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर एकूण ३० जणांची भरती करण्यात आली. यामध्ये परिचर, कनिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक लेखा आदी पदांची भरतीप्रक्रिया राबविण्यात आली.

जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील भरतीप्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर आदी उपस्थित होते.

सहा वर्गांमध्ये एकूण ३० जणांना नियुक्ती देण्यात आली. सन-२०२२ मधील अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती देण्याकामी १५९ पात्र उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. या सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

वर्ग-तीन व वर्ग-चारमधील अनुकंपा भरतीसाठी संवर्गनिहाय व प्रवर्गनिहाय उपलब्ध असलेल्या पदांनुसार, तसेच शैक्षणिक अर्हतेनुसार ज्येष्ठता सूचीनुसार एकूण ३० जणांना नेमणूक देण्यात आली आहे.

यामध्ये परिचर : २१, कनिष्ठ सहायक लिपिक : ५, कनिष्ठ सहायक लेखा : १, वरिष्ठ सहायक लेखा : १, पर्यवेक्षिका : १, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) : १ ही पदे भरण्यात आली आहेत.

दरम्यान, जिल्बा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर म्हणाले की, जिल्हा परिषदेत एकूण सहा प्रवर्गांत ३० जणांची अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात आलेली आहे. ही भरतीप्रक्रिया पारदर्शकपणे करून सर्वांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. 

---------------

👉 गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी शहर जिल्हा महिला काँग्रेसने पंतप्रधानांना...

👉 हिंदी अध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा.म्हसे तर सचिव प्रा.गायकवाड

👉 वृक्षारोपण हाच पर्यावरण असमतोलावर एकमेव पर्याय : मनोज पाटील

Post a Comment

Previous Post Next Post