आरोग्य विभागाने‎ जिल्ह्यातील २४५९ पाणी नमुने‎ तपासले

। अहमदनगर । दि.19 जुलै 2022 । नगर तालुका‎ जून महिन्यात आरोग्य विभागाने‎ जिल्ह्यातील २४५९ पाणी नमुने‎ तपासले. त्यापैकी ८५ गावांतील १३२‎ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.‎ यामध्ये नगर तालुक्यातील दहा‎ गावांचा समावेश असल्याची‎ माहिती समोर आली. जिल्ह्याच्या‎ ग्रामीण भागात पाणी योजना उभ्या‎ करून शुद्ध पाणीपुरवठा‎ करण्यासाठी केंद्र आणि राज्य‎ सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च‎ केले जात आहेत. 

मात्र, दरवर्षी‎ पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित‎ असल्याचे समोर येत आहे. जिल्हा‎ परिषदेचे आरोग्य विभागाकडून‎ नियमितपणे पाण्याच्या नमुन्याची‎ तपासणी केली जाते. तपासणीत‎ पाणी दूषित असल्याचे आढळून‎ आल्यास संबंधित ग्रामपंचायतींना‎ पाणी शुद्धीकरणाबाबत तसेच इतर‎ उपाययोजना करण्याच्या नोटिसा‎ दिला जातात.

तरी जिल्ह्यातील सर्व‎ गावांना शुद्ध पाणीपुरवठा करणे‎ शक्य होत नसल्याचे दिसून येत‎ आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर‎ जून महिन्यात जिल्ह्यातील विविध‎ ठिकाणाच्या पिण्याच्या पाण्याच्या‎ स्रोतांमधील २४५९ पाणी नमुने‎ तपासण्यात आले. त्यापैकी १३२‎ नमुने दूषित आढळले आहेत. 

या‎ ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी‎ उपाययोजना करण्याच्या सूचना‎ दिल्या . नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत‎ तपासते दूषित पाणी आढळलेल्या‎ नगर तालुक्यातील गावांत इमामपूर,‎ राळेगण, शिराढोण, दहिगाव,‎ साकत, नागरदेवळे, बुऱ्हानगर,‎ पांगरमल, उदरमल, पिंपळगाव‎ माळवी व उक्कडगाव ही गावे‎ आहेत.‎

-------------

👉 राष्ट्रपती निवडणूक २०२२; निवडणूक मतपेटी दिल्लीकडे रवाना 

👉  पत्नीला जीन्स घालण्यास विरोध करणे पतीला पडले महागात

👉  कृषी विक्री परवान्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करावी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Post a Comment

Previous Post Next Post