राष्ट्रीय व्यवस्थापन स्पर्धेत कृषि महाविद्यालय, पुणे येथील विद्यार्थ्यांचे तामिळनाडू कृषि विद्यापीठात घवघवीत यश


। अहमदनगर । दि.07 जुलै 2022।  महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालय, पुणे येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तामिळनाडू कृषि विद्यापीठ, कोईमतूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय व्यवस्थापन स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झाले होते. 

सदर बैठकीत प्रबंदाज 2022 घटकांतर्गत व्यवसाय नियोजक म्हणून शांकीकुमार आणि कृष्णा देशमुख यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषक मिळविले आहे. उत्तम व्यवस्थापक म्हणून अमित पाटील आणि मनुष्यबल व्यवस्थापन स्पर्धेत कु. श्रेया फडतरे आणि आकाश क्षीरसागर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषक मिळविले आहे. तामिळनाडू कृषि विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. व्ही. गीतालक्ष्मी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल आणि शिस्तबद्ध वागणुकीबाबत विशेष कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

सदर स्पर्धामध्ये विजेत्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना कृषी महाविद्यालय, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. सुनील मासळकर, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. संजय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल सहभागी स्पर्धकांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख व अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी अभिनंदन केले.

-------------

👉 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

👉 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

👉 जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप 

Post a Comment

Previous Post Next Post