अमरनाथला ढगफुटीमुळे दरड कोसळून दुर्घटना ; अहमदनगरचे यात्रेकरून सुखरूप

। अहमदनगर । दि.09 जुलै 2022। अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी सायंकाळी ढगफुटीमुळे पूर दरड कोसळून दुर्घटना झाली. हा सर्व थरार अहमदनगर जिल्ह्यातील भाविकांनी डोळ्यादेखत पाहिला आहे. एका भाविकाच्या टेंटवर सुरवातीला बारिकसा दगड आला. त्यानंतर तो तातडीने बाहेर पडला. त्यानंतर सगळा हाहाकार उडाला. त्याने हा हाहाकार आपल्या डोळ्या देखत पाहिला. 

या दुर्घटनेनंतर लष्कार एनडीआरफ आणि एसडीआरफच्या जवनांनी त्वरीत अमरनाथचे दर्शन बंद केले. त्यामुळे या भाविकांना दर्शनशिवाय परतावे लागले. आगामी दोन दिवस दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक भाविकांना निम्या रस्त्यातूनच माघारी परतावे लागले आहे. 



शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अमरानाथ गुहेच्या पायर्‍यांजवळ अचानक ढगफुटी झाल्याने डोंगर फुटून दगड-मातीचे ढिगारे पाण्याच्या प्रवाहासोबत जोरात वाहून आले. डोंगरातील दगड, माती वाहून आल्यामुळे दर्शन मार्ग बंद झाला.

 

या परिसरात साधारण एक किलोमीटरपर्यंत भाविकांचे तंबू होते. प्रत्येक तंबुमध्ये सुमारे 15 भाविक होते. ढगफुटीमुळे अनेक टेंट आणि त्यातील भाविक वाहून गेले. त्यामुळे कितीजण बेपत्ता व मृत्यूमुखी पडले याचा अंदाज कोणालाच नाही. या घटनेनंतर एनडीआरफ व एसडीआरफच्या तुकड्या मदत व बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल आहेत. या ठिकाणावरून भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात येत आहे.

नगर जिल्हा परिषदेतील 11 जण 3 जुलै रोजी नगरहून रेल्वेमार्गे अमरनाथला रवाना झाले आहेत. या भाविकांचेे पथक अमरनाथ मंदिरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत पोहचले होते. त्यातच ढगफूटी झाली. त्यामुळे सगळीकडे हाहाकार उडाला असून दर्शन बंद करणयात आलेले आहे.

या सर्व भाविकांना बालाठाण मार्गे फिरण्याच्यासूचना केल्या. जिल्हा परिषदेतील कर्मचारी ऋषिकेश बोरूडे, सागर भंडारी, सुनील सूळ, संभाजी भदगले, रमेश औटी, शरद साळुंके, जयेंद्र पट्टे, ऋषिकेश बनकर, शिवाजी गायकवाड, सचिन दिनकर, विजय बर्डे आदींनी लांबूनच दर्शन घेत परतीचा मार्ग अवलंबिला होता.

जिल्ह्यातील आणखी काहीजण अमरनाथ यात्रेवर गेलेलेआहेत. काहींनी अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आहे तर काहीजण वाट पाहून दर्शन करून येण्याच्या नियोजनात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेला गेलेले सर्व भाविक सुखरुप असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

------------

👉 महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ

👉 मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको

👉 धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही...

Post a Comment

Previous Post Next Post