माजी मंत्री प्रा.राम शिंदेंच्या रुपाने सर्वसामान्यांना न्याय...

 

।अहमदनगर। दि.11 जुलै 2022 ।  जामखेड तालुकाध्यक्ष ते प्रदेश उपाध्यक्ष  अशा 20 वर्षांपासूनच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्याची दखल वरिष्ठांनी घेतल्यानेच कर्जत-जामखेडची आमदारकी, मंत्रीपद आणि आता विधान परिषदेवर संधी दिल्याने माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या कार्याकडे पाहून भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळतो, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड यांनी व्यक्त केले.


विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर प्रा.राम शिंदे यांच्या शपथविधी प्रसंगी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसमवेत प्रा. बेरड मुंबईला उपस्थित होते. यावेळी सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते. 
यावेळी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. युवराज पोटे,  दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, अशोक खेडकर, जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे,माजी नगरसेवक सचिन पारखी, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, अ‍ॅड. शिवाजीराव अनभुले, श्रीपाद डेरे आदि उपस्थित होते. 
 
प्रा. बेरड म्हणाले की, कर्जत-जामखेड  विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जातो. मतदार संघात खुला झाल्यानंतर 2009 साली प्रा.राम शिंदे यांनी संघटनेच्या कामाच्या जोरावर उमेदवारी मिळवत विजय संपादन केला. 

प्रास्तापितांच्या नगर जिल्ह्यात सर्वसामान्य कुटूंबातून राजकारणात पदार्पण केलेल्या प्रा.राम शिंदे यांनी 5 वर्षांत लोकलेखा समितीसह अनेक राज्यपातळीवर समित्यांवर भरीव काम केेले. पक्ष संघटनेत जिल्हाध्यक्ष पदावर सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यामुळे प्रदेश सरचिटणीस पदावर राज्य पातळीवर संधी मिळाली. 

सध्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर जबाबदारी सांभाळत असल्याने राज्य पातळीवर नगर जिल्ह्याचा नावलौकिक झाला. आता राज्यात सत्ता बदलात नगर जिल्ह्याचे वेगळेपण या निमित्ताने दिसून येईल, असे प्रा.बेरड यांनी सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.
--------------
 
 
 

Post a Comment

Previous Post Next Post