जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती


। अहमदनगर। दि.12 जुलै 2022 । राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात आज सुनावणी झाली. 

एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

--------------

👉 राष्ट्रवादी देणार ओबीसींना 27 टक्के उमेदवारी 

👉  माजी मंत्री प्रा.राम शिंदेंच्या रुपाने सर्वसामान्यांना न्याय...

👉  कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने केली आत्महत्या

Post a Comment

Previous Post Next Post