मनपा पतसंस्थेची मृत सभासदांना कर्जमाफी

कुटुंबीयांना मिळाला 7 लाखाचा दिलासा

। अहमदनगर । दि.30 जुलै । मनपा कर्मचारी पतसंस्थेने मृत सभासदांच्या कुटुंबाला आधार दिला असून, मनपा पतसंस्थेच्या सात मृत सभासदांचे कर्ज निवारण निधीतून सात लाख रुपये माफ केले असल्याची माहिती अध्यक्ष अजय कांबळे यांनी दिली.

अहमदनगर महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची सभा चेअरमन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच होऊन या सभेचा ठराव क्रमांक 8 नुसार (कै.) राजू सुपेकर, (कै.) विजय साळवे, (कै.) बबन घोरपडे, (कै.) मीना शेंडगे, (कै.) मीना चव्हाण, (कै.) संजय दळवी व (कै.) जालिंदर बेरड या सात सभासदांच्या कर्ज निवारण निधीतून त्यांच्याकडून पतसंस्थेला येणे असलेले सुमारे सात लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. 

या विषयांची सूचना संचालक बाबासाहेब मुदगल यांनी मांडली तर संचालक किशोर कानडे यांनी अनुमोदन दिले. यापूर्वीही संचालक मंडळाने अनेक मृत सभासदांचे कर्ज निवारण निधीमधून माफ केले आहे. 

या सभेस व्हॉईस चेअरमन कैलास चावरे, संचालक जितेंद्र सारसर, सतीश ताठे, विकास गीते, श्रीधर देशपांडे, बलराज गायकवाड, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, सोमनाथ सोनवणे, गुलाब गाडे, किशोर कानडे, बाळासाहेब गंगेकर, संचालिका प्रमिलाताई पवार, उषाताई वैराळ, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी उपस्थित होते. 

सभासदांच्या अडीअडचणीच्या काळामध्ये पतसंस्थेने नेहमीच मदतीचा हात दिला असून त्यांच्या कुटुंबीयांना मनपा पतसंस्थेने आधार देण्याचे काम केले आहे. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच मनपा पतसंस्था काम करीत आहे असे अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले.

------------

👉 कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान...

👉 राज्यात दहीहांडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

👉 थकित शास्तीवर ३१ जुलैपूर्वी दंड भरल्यास ९० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार

Post a Comment

Previous Post Next Post