महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी वैभव लांडगे बिनविरोध


। अहमदनगर । दि.27 जुलै । महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांची बिनविरोध निवड झाली. भारतीय कुस्ती महासंघाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी बरखास्त केली होती. तेव्हापासून नवीन कार्यकारिणीची उत्सुकता लागली होती. 

👉 प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

महासंघाने नागपूरमध्ये ही निवडणूक प्रक्रिया राबवली. ती बिनविरोध झाल्याने कुस्तीप्रेमींनी आनंद व्यक्त केला. अध्यक्षपदी रामदास तडस, सरचिटणीसपदी काकासाहेब पवार, वरिष्ठ उपाध्यक्षपदी विजय बराटे, उपाध्यक्षपदी वैभव लांडगे (नगर) व कार्याध्यक्षपदी धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड झाली. 

👉 एकाच दिवसात पाच दुचाकी चोरीला; तपासाचे आव्हान

लांडगे कुटुंबीयांचे कुस्तीमध्ये मोठे योगदान आहे. दख्खन का काला चित्ता म्हणून देशाच्या कुस्ती क्षेत्रात प्रसि असलेल्या (कै.) पै. छबूराव लांडगे यांचे वैभव हे नातू आहेत. छबूराव यांनी मैदानातील कुस्तीबरोबरच राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बांधणीत मोठे योगदान दिले आहे. ते सलग तीस वर्षे कार्यकारिणी सदस्य होते. 

👉  गडकिल्ल्यांच्या दुरवस्थेवर उपाययोजना करा : संभाजीराजे


Post a Comment

Previous Post Next Post