अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे पडले महागात


। अहमदनगर । दि.07 जुलै 2022। अनोळखी व्यक्तीला दुचाकीवरून घेऊन जाणे युवकाला महागात पडले. अनोळखी व्यक्तीने युवकाच्या खिशातील ५० हजारांची रोख रक्कम काढून घेतल्याची घटना मंगळवारी सावेडी उपनगरात घडली. याप्रकरणी हर्षल दत्तात्रय कुसमुडे (धामोरी ता. राहुरी) यांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली.

हर्षल यांचे चुलते ज्ञानदेव कुसमुडे (रा. तपोवन रस्ता) यांनी हर्षलकडे ५० हजारांचा चेक दिला. चेक वटवून ५० हजार रुपये झुंबरराव बाचकर (रा. उंबरे ता. राहुरी) यांना देण्यास सांगितले होते. हर्षल यांनी चेक वटवून ५० हजारांची रक्कम ताब्यात घेतली.

त्यावेळी महाराष्ट्र बँकेतून एक अनोळखी व्यक्तीने प्रेमदान चौकामध्ये सोडा, असे म्हणल्याने त्याला दुचाकीवर बसवले. परंतु त्याच्या खिशातील रक्कम अनोळखीने लांबवली.

-----------

👉 विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली

👉 आषाढीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

👉 जिल्हाभर अतिमुसळधार पाऊस कायम; पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट

Post a Comment

Previous Post Next Post