कृषी विभाग झोपेत ; शेतकर्‍यांची लूट सुरु

। अहमदनगर । दि.19 जुलै 2022 ।  जिल्ह्यात खताची मुबलकता असून खत विक्रेत्यांकडून सध्या लूट सुरु आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रार करूनही ठोस कारवाई केली जात आहे. अधिकाऱ्यांकडून तक्रारींकडे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त कली जात आहे.


जिल्ह्यात रासायनिक खताची 2434 विक्रेते आहेत. त्यातील काही विक्रेत्यांनी पैसे कमविण्याचा वेगळा फंडा सुरु केलेला आहे. विशिष्ट खताच्या गोणीबरोबरच इतर खत व औषधे बियाणे विकण्याचा सपाटा लावला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे. ही लूट थांबविण्याची मागणी होत आहे. मात्र त्याकडे कृषी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.  

👉 आरोग्य विभागाने‎ जिल्ह्यातील २४५९ पाणी नमुने‎ तपासले

 मागील वर्षात जिल्ह्यात खतांची टंचाई निर्माण झालेली होती. त्यामुळ शेतकर्‍यांना वेळेत खते उपलब्ध होत नव्हती. यंदा तशी परिस्थिती उदभवू नये, यासाठी कृषी विभागाने अगोदरपासून नियोजन केलेले आहे. सध्या जिल्ह्यात खतांची उपलब्ध चांगली आहे. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार त्यांना तातडीने खते उपलब्ध होत आहे.

👉 ७२ कोटींच्या बनावट बिलांप्रकरणी जीएसटी विभागाकडून पुण्यातील व्यापाऱ्यास अटक

मात्र सध्या खताच्या प्रत्येक गोणी मागे कीटकनाशके व इतर खते खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे शेतकर्‍यांची लूट होत आहे. याबाबत अऩेकांनी कृषी विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र कृषी विभागाकडून जुजबी कारवाई केली जात आहे. परिणामी खत विक्रेते आता कोणाला घाबरत नाहीत. ते त्यांच्या  मनमानी पध्दतीने कामकाज करीत आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या कारवाईवर संशय़ व्यक्त केला जात आहे.

👉 माळीवाडा बसस्थानकातून विवाहित महिलेसह मुलगा बेपत्ता 

दोषी खत विक्रेत्यांवर फक्त सहा ते सात दिवसांची कारवाई होत आहे. या वर्षी या पेक्षा जास्त मोठी कारवाई झालेली नाही. त्यामुळे ही कारवाईची मोहिम संशयास्पद वाटत आहे. याबाबत वेगळीच चर्चा सुरु झालेली आहे. परिणामी  आता कृषी विभागाने आता गांभिर्याने कारवाई मोहिम राबविण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post