धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे


। मुंबई । दि.08 जुलै 2022 । शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आज मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे म्हणाले की, ’शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असा इशारा ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना पक्ष केंद्रस्थानी आहे.  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बहुसंख्य आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. भाजपाच्या पाठिंब्यानं शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत.

त्यांच्या नियुक्तीला शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिवसेनेतील बहुसंख्य आमदार गमावल्यानंतर पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण चिन्ह देखील ठाकरे गट गमावण्याची शक्यता बेलली जात असतानाच ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. 

आमदार पळून गेल्याने पक्ष संपत नसतो
शिवसेनेचे आमदार पळून गेले आहेत. मात्र आमदार पळून गेल्याने पक्ष संपत नसतो असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेनेसोबत साधी माणसे आहेत. त्यामुळे शिवसेना कधीच संपणार नसल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

---------------

💥 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

💥 एकनाथ शिंदे यांनी नैतिकता पाळून आषाढीच्या मुख्य शासकीय पूजेला जाऊ नये : गिरीश जाधव

💥 जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी



Post a Comment

Previous Post Next Post