काँग्रेसच्या माध्यमातून किरण काळे शहराचे आमदार होतील : माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात

। संगमनेर । दि.25 जुलै 2022 ।  नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम संघटनात्मक बांधणी सुरू आहे. सातत्याने पक्षप्रवेश सुरू आहेत. काळे यांनी शहरात नव्या दमाची चांगली टीम उभी केली आहे. शहरातील विविध घटक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी ते नेहमी धावून जात असतात. अशाच पद्धतीने समाजाचे काम त्यांनी सतत सुरु ठेवले आणि संघटनात्मक बांधणी शहरात सातत्याने सुरू राहिली तर काळे नक्की काँग्रेसच्या माध्यमातून शहराचे आमदार होतील, असा विश्वास माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

संगमनेर तालुक्यातील मीरपूर येथे आयोजित मेळाव्यात माजी मंत्री थोरात बोलत होते. या मेळाव्यात आ.थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे माजी उपशहर प्रमुख अभिनय गायकवाड, प्रभाग क्रमांक १२ मधील माळीवाडा भागातील ज्योती उमेश साठे, पै. दीपक जपकर, सावेडीतील इंजि. सुजित क्षेत्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आ. थोरात यांनी यावेळी त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी काळे यांच्यासह मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, निलेशदादा चक्रनारायण, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे व्हॉइस चेअरमन माधवराव कानवडे, संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओव्हळ, मागासवर्गीय काँग्रेस विभागाचे प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे आदी उपस्थित होते.

यावेळी गायकवाड, साठे, जपकर यांच्यासह राहुल गोहेर, विनोद दिवटे, संभाजीराजे, शाहू होले, सौरभ भुजबळ, रमेश पुरी, राजू डाके, सतीश गायकवाड, शहबाज बागवान, तोफिक शेख, हरुण इनामदार, विजय जाधव, मोसिन शेख, रवी वाव्हळ, रणजीत जाधव, आदेश साठे, मनोज वाळके, भैय्या साठे, भगवान जगताप, अभिजीत साठे, प्रमोद वाघमारे, सागर साळवे, अंबादास गाडे, अश्विन पानपाटील, मंगेश बर्गे, राम तिवारी, स्वप्निल सातव आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

किरण काळे म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीमध्ये सर्वात मागासलेला मतदारसंघ आहे. आजही असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. संगमनेर मध्ये नगरपरिषद असून देखील आ. बाळासाहेब थोरात यांच्या विकासात्मक व्हीजन मधून विकासाचे चांगले मॉडेल संगमनेरमध्ये राबविले गेले आहे. नगर शहरामध्ये देखील संगमनेरच्या धर्तीवर विकासाचे मॉडेल राबवण्याची गरज आहे. आगामी काळात महानगरपालिकेत सत्ता मिळवत शहर काँग्रेस विकासाच्या संगमनेर मॉडेलची अंमलबजावणी नगर शहरामध्ये निश्चितपणे करेल.

मनसेचे उपशहर प्रमुख असणाऱ्या अभिनय गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी लगेचच काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर गायकवाड म्हणाले की, मनसेने मला संधी दिली. मी त्याबद्दल मनसेचा आभारी आहे. मात्र शहराला काळे यांच्या निर्भीड व विकासाचे व्हीजन असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. ज्योती उमेश साठे या प्रभाग १२ भागातील असून त्यांचे प्रभागामध्ये चांगले महिला संघटन आहे. त्या महालक्ष्मी बचत गट अभियानाच्या प्रमुख असून महालक्ष्मी देवस्थानच्या उपाध्यक्ष देखील आहेत. काँग्रेसच्या माध्यमातून शहरात  महिलांचे संघटन बळकट करण्यासाठी आपण काम करणार असल्याचे पक्ष प्रवेशा नंतर बोलताना साठे यांनी म्हटले आहे. 

--------------

👉 आदित्य ठाकरे यांचा शिर्डी आणि नेवासा येथे कार्यकर्त्यांशी संवाद

👉 एसटी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये

👉 लोक पुरात वाहून गेल्यानंतर सीना नदीची नालेसफाई होणार का : भुतारे

Post a Comment

Previous Post Next Post