जेष्ठ पत्रकार सुधीर पवार यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून केले नेत्रदानाचा संकल्प


। अहमदनगर । दि.28 जुलै ।  वाढदिवसाचे औचित्य साधून नगर येथील जेष्ठ पत्रकार सुधीर पवार यांनी नेत्रदानाचा संकल्प करुन जिल्हा शासकीय रुगणालयाती नेत्रालय कक्षात नेत्रदानाचा संकल्प केले.

बुधवार दि.27 रोजी पत्रकार सुधीर पवार यांचा 60 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसाला इतर खर्च व फ्लेक्स न लावता त्यांनी सामाजीक बांधीलकी जपत सामाजिक कार्यकर्ते जालींदर बोरुडे, संजय सावंत, अन्सार सय्यद यांच्यासह बोरुडे यांच्या नेत्रदान चळवळ ही पवार यांनी जवळून पाहीली त्यामुळे प्रेरीत होवून अंधाना दृष्टी देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून नेत्रदान करण्याचा संकल्प केला.

पत्राकार सुधीर पवार यांना वाढदिवसा निमित्त तसेच त्यांच्या उपक्रमाबद्दल पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, स्थानीक गुन्हे शाखेचे अनिल कटके, डॉ.हेमंत देशपांडे, डॉ.दिलीप पवार, श्रीराम जोशी, बालकुणाल अहिरे यांच्यासह पत्रकार, पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post