पत्नीला जीन्स घालण्यास विरोध करणे पतीला पडले महागात


।  जोरभिटा । दि.17 जुलै 2022 । पत्नीला जीन्स घालण्यास विरोध करणे पतीला महागात पडले. पतीने जीन्स घालण्यास विरोध केल्याने संतापलेल्या पत्नीने पतीवर चाकूने वार करून पतीला जबर जखमी केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना झारखंडमधील जोरभिटा गावात घडली आहे. या घटनेतंतर  जखमी पतीला धनबाद येथील पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  

12 जुलैला संध्याकाळी पत्नी पुष्पा हेमब्रम काही लोकांसोबत जीन्स घालून गोपालपूर गावात जत्रा पाहण्यासाठी गेली होती. पती आंदोलन तुडू याने पत्नीला जीन्स घातलेली पाहिल्यानंतर त्यावर आक्षेप घेतला. तसेच तुझे लग्न झाले आहे, आता तू जीन्स घालायची नाही, असे सांगितले.

तीच गोष्ट पुष्पा हेमब्रमला खटकली व पुष्पाने विरोध करत पतीसोबत भांडण केले. यादरम्यान तिने रागाच्या भरात चाकू उचलला. त्यानंतर चाकूने पतीवर वार केले. या घटनेत पती गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

-----------

👉 कृषी विक्री परवान्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करावी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

👉 माळीवाडा बसस्थानकातून विवाहित महिलेसह मुलगा बेपत्ता

👉  निर्यात वाढविण्यासाठी कृषी उत्पादनांची गुणवत्तावाढ आवश्यक : केंद्रीय मंत्री

Post a Comment

Previous Post Next Post