रामदास कदमांच उद्धव ठाकरेंना भावनिक आवाहन


। मुंबई । दि.19 जुलै 2022 । शिवसेना नेते रामदास कदम यांनी अखेर आपल्या नेतेपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. त्यानंतर आज टीव्ही ९ मराठीशी बोलताना ते अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आहे. 

गेली ५२ वर्षे मी शिवसेनेसाठी झोकून देऊन काम केलं. आम्ही कष्टाने शिवसेना उभारली. मात्र, आज तीच शिवसेना आमच्या डोळ्यांदेखत पत्त्यासारखी कोसळत आहे. 

आयुष्याच्या संध्याकाळी हे सर्व पाहण्याची वेळ आमच्यावर आली आहे. हे आमच्यासाठी खूप वेदनादायी आणि दु:खदायी आहे. गेल्या महिनाभरापासून आम्हाला झोप लागत नाही, जेवण जात नाही. रात्री-अपरात्री मी झोपेतून उठून बसत आहे, 

माझी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विनंती आहे. शिवसेनेला वाचावा. अजूनही वेळी गेलेली नाही, शिंदेंना साथ द्या. त्यांना सोबत घेण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतो, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. 

---------------

👉 कृषी विभाग झोपेत ; शेतकर्‍यांची लूट सुरु

👉 आरोग्य विभागाने‎ जिल्ह्यातील २४५९ पाणी नमुने‎ तपासले

👉 ७२ कोटींच्या बनावट बिलांप्रकरणी जीएसटी विभागाकडून पुण्यातील व्यापाऱ्यास अटक

Post a Comment

Previous Post Next Post