खोसपुरी येथील तरुणाची विष पिऊन आत्महत्या


 । अहमदनगर । दि.31 जुलै । नगर तालुक्यातील खोसपुरी भागात राहणारा तरुण नानासाहेब वासुदेव नागरगोजे (वय 38) याने काहीतरी विषारी औषध प्यायल्याने त्याला तातडीने त्याचा मेहुणा शिवनाथ गजाबा खाडे याने नगर शहरातील सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तेथे डॉक्टरांनी तपासले असता नानासाहेब वासुदेव नागरगोजे या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता. या प्रकरणी डॉक्टरांच्या अहवालावरून एमआयडीसी पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली 

असून नानासाहेब नागरगोजे या तरुणाने विष प्यायले का? त्याच्या पोटात विष कसे गेले? याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post