नागरदेवळे नगर परिषदेला पाच कोटींच्या निधीचा बार फुसकाच...

। अहमदनगर । दि.24 जुलै 2022 । नागरदेवळे नगर परिषदेला पाच कोटींच्या निधीचा बार फुसकाच आहे. प्रत्यक्षात कोणताही निधी प्राप्त झालेला नाही, असा आरोप मादी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कर्डिले यांनी म्हटले आहे की, नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी (ता. नगर) ग्रामपंचायत बरखास्त करून नगर परिषद स्थापनेचा घाट घालत मोठ्या थाटात पाच कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. परंतु नगरपंचायतची घोषणा होऊन तीन महिने उलटले तरीही अद्यापपर्यंत नगर पंचायत खात्यावर एक रुपयाचा निधी वर्ग झालेला नाही. हा प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे.

आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्वतःच्या राजकारणासाठी नागरदेवळे, बाराबाभळी व वडारवाडी ग्रामस्थांना वेटीस धरले आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे.  

प्रत्यक्षात एकही जबाबदार अधिकारी नियुक्तीवर नव्हता परंतु माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी प्रशासकीय समस्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी विविध अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती केली.

आमदार तनपुरे व त्यांचे उत्साही कार्यकर्ते पदाधिकारी मात्र फक्त नगरपंचायत स्थापनेचा ढोल वाजवत मोठ्या विकास कामांची स्वप्ने दाखवण्यातच मशगुल राहिले. जनतेला वारेवार सोडले कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसल्यामुळे नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी गावातील विकासाचे प्रश्न प्रलंबित राहिलेत, असा आरोप माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केला.

-------------

👉लोक पुरात वाहून गेल्यानंतर सीना नदीची नालेसफाई होणार का : भुतारे

👉राष्ट्राभिमान जागृत करणारा आनंदी क्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

👉 सुमारे ११७.१४ कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक

Post a Comment

Previous Post Next Post