कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान...


। मुंबई । दि.30 जुलै 2022 । शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शुक्रवारी अपर मुख्य सचिव अनूप कुमार यांच्या सहीने अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील सुमारे १४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

👉राज्यात दहीहांडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

पीक कर्जाची रक्कम ५० हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. एकपेक्षा अधिक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन ५० हजार रुपयांच्या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल. प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.

👉 थकित शास्तीवर ३१ जुलैपूर्वी दंड भरल्यास ९० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार

या योजनेसाठी राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेतले जाणार आहे.

👉 सरपंच पदाची थेट निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

Post a Comment

Previous Post Next Post