हिंदी अध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा.म्हसे तर सचिव प्रा.गायकवाड


। अहमदनगर । दि.13 जुलै 2022 ।  महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी प्रा.सतीष म्हस्के यांची तर सचिवपदी गुलाब दामोदर गायकवाड तर कार्याध्यक्षपदी प्रा.मुक्ता लांडे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रा.म्हस्के यांनी जिल्हा कार्यकारणी जाहीर केली असून लवकरच तालुका कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक संघ जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे जिल्हाध्यक्ष प्रा.सतीष म्हस्के, श्रीरामपूर प्रा.अडसुरे भाऊ्साहेब  नारायण (उपाध्यक्ष) न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅड सायन्स कॉलेज, शेवगाव, प्रा.पवार वसंत किसन (उपाध्यक्ष) अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब पपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले, प्रा.मुक्ता सुभाष लांडे-करांडे (कार्याध्यक्ष)  रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेज, अहमदनगर

प्रा.लोभगे अशोक रामचंद्र (उपकार्याध्यक्ष) श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय,पाथरे, तालुका राहता, प्रा.गुलाब दामोदर गायकवाड, (सेके्रटरी) डी.एम.पेटी कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर, प्रा.निर्मळ विमल विठ्ठल (सह सेक्रेटरी) श्रमीक कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर, प्रा.वारुळे चंद्रकांत दत्तात्रय (खजिनदार) श्री साईनाथ उच्च माध्यमिक विद्यालय शिर्डी, प्रा.सामल वैशाली अतुल (सहखजिनदार) पेमराज सारडा महाविद्यालय,अहमदनगर

या जिल्हा कार्यकारणीतील नवनियुक्त सर्व पदाधिकार्‍यांना पुढील काळात हिंदी जनजागृती व संघाचे कार्य करण्याची संघाचे राज्याध्यक्ष डॉ.मिलिंद कांबळे, राज्य सचिव प्रा.रेवनाथ कर्डिले, राज्य सल्लागार प्रा.संजय पवार, कार्याध्यक्ष प्रा.सुंदर लोंढे, पुणे विभागीय अध्यक्ष डॉ.नेहा बोरसे, विभागयी उपाध्यक्ष प्रा.सुभाष चिंधे यांनी शुभेच्छा तसेच सर्वांचे अभिनंदन केले.

--------------

👉 प्रचलित अनुदानासाठी भरपावसात प्राध्यापकांची मोटरसायकल दिंडी

👉 वृक्षारोपण हाच पर्यावरण असमतोलावर एकमेव पर्याय : मनोज पाटील

👉 जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

Post a Comment

Previous Post Next Post