द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ!

। नवी दिल्ली । दि.25 जुलै 2022 ।  देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज त्यांच्या राष्ट्रपतीपदाची शपथ  ग्रहण करणार आहेत. सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी संसदेच्या सेंट्रल हॉल येथे हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तसेच, मुख्य न्यायाधीश एन.वी.रमण त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

शपथविधी सोहळ्यादरम्यान २१ तोफांची सलामीही देण्यात येणार आहे. राष्ट्रपती यांची शपथ विधी झाल्यानंतर त्या देशाला संबोधित करणार. द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेसुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे.

------------

👉 आदित्य ठाकरे यांचा शिर्डी आणि नेवासा येथे कार्यकर्त्यांशी संवाद

👉 लोक पुरात वाहून गेल्यानंतर सीना नदीची नालेसफाई होणार का : भुतारे

👉 काँग्रेसच्या माध्यमातून किरण काळे शहराचे आमदार होतील : माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात

Post a Comment

Previous Post Next Post